Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री आनंदराव पवार महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ८७.५० टक्के

श्री आनंदराव पवार महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ८७.५० टक्के

चिपळूण (प्रतिनिधी) : श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे श्री आनंदराव पवार आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचा इ. १२ वीचा एकत्रित निकाल ८७.५० टक्के इतका निकाल लागला असून त्यामध्ये आर्ट्स शाखेचा निकाल ८८.२३ टक्के, कॉमर्स शाखेचा निकाल ९३.७५ टक्के तर सायन्स शाखेचा निकाल ८४.६१ टक्के इतका लागला आहे.

आर्ट्स शाखेतून कु. आभा यतीन जाधव ८२.५० टक्केसह प्रथम, कु. सोनिया सचिन गोवळकर ७२.८३ टक्केसह व्दितीय तर कु. वेदांती मिलिंद दहीवलकर ७१.१७ टक्केसह तृतीय आलेली आहे. कॉमर्स शाखेतून कु. मानस मिलिंद मुकनाक ७७.३३ टक्केसह प्रथम, कु. दिपा निंगराज चव्हाण ६७.१७ टक्केसह व्दितीय तर कु. कांचन भिमाशंकर वाघमारे ६७ टक्केसह तृतीय आली आहे. सायन्स शाखेतून कु. ऋग्वेद दिपक सावंत ७८.८३ टक्केसह प्रथम, कु. वेद मुरलीधर वारे ७८.६७ टक्केसह व्दितीय, तर कु. गौरी अविनाश पाटील ७२.६७ टक्केसह तृतीय आलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत देवळेकर सर, संस्थेचे कार्याध्यक्ष राजेश खेडेकर सर, कॉलेज कमिटी चेअरमन मल्लेश लकेश्री, संस्थेचे कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अरुणा सोमण, प्राचार्य भाऊ कांबळे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments