चिपळूण (प्रतिनिधी) : येथील डीबीजे महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ८८.७३ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून एकूण ७७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी ६८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ७२ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १३९, द्वितीय श्रेणीत ३२२ तर तृतीय श्रेणीत १५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेतून ३२० विद्यार्थ्यांपैकी ३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ११ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ६० विद्यार्थी प्रथम श्रेणी, १६५ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ६८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून ३६६ विद्यार्थ्यांपैकी ३१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ५४ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ६९ विद्यार्थी प्रथम श्रेणी, १३२ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ६२ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ८६.६१ टक्के लागला आहे. कला शाखेतून ८६ विद्यार्थ्यांपैकी ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७ विद्यार्थी विशेष प्राविण्य, १० विद्यार्थी प्रथम श्रेणी, २५ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर २२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ७४.४१ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून कलिका घाग (८७,१७) प्रथम, समृद्धी लोंढे (८६.१७) व मृण्मयी कुलकर्णी (८६१७) यांनी विभागून द्वितीय क्रमांक, साई घोसाळकर (८५.५०) तृतीय, रागिणी जाधव (८४.५०) चतुर्थ तर अभिनव पेढांबकर (८२.३३) हा पाचवा आला आहे. वाणिज्य शाखेतून सावनी ओक (९५) प्रथम, ईप्शिता टिळक (९३.८३) द्वितीय, सुहानी निघोट (९३.५०) तृतीय, अस्मि चव्हाण (९२.६७) चतुर्थ तर सृष्टी पाटील (९२.३३) ही पाचवी आली आहे. कला शाखेतून लाघवी सावले (९५.८३) प्रथम, पायल सहारन (९०) द्वितीय, मीरा पोंक्षे (८८) तृतीय, स्वरा पुरोहित (८६) चतुर्थ, निशा आडविलकर (८३,६७) पाचवी आली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे नवकोकण सोसायटीचे अध्यक्ष बापू भिडे, चेअरमन मंगेश तांबे, व्हाईस चेअरमन डॉ. दीपक विखारे, डीबीजेचे प्राचार्य डॉ. माधव बापट, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्रीमती स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ. सुजाता खोत, प्रबंधक विजय जाधव व सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.



