चिपळूण (वार्ताहर) : रामपूर एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद हायस्कूल मातोश्री एम. ठाकरसी जुनिअर कॉलेज रामपूर या कॉलेजमधील बारावी आर्ट्स व कॉमर्स यांचा संयुक्त निकाल ९४.११ टक्के लागलेला आहे. मोतीबाई एम. ठाकरसी जुनियर कॉलेज रामपूर कॉमर्स शाखेतून एकूण २८ विद्यार्थी बसले होते, यातील २८ विद्यार्थी पास झाले असून १०० % निकाल लागला आहे. बारावी कॉमर्स मधून प्रथम क्रमांक कु. राज दत्ताराम सोलकर (७१.५०%), द्वितीय क्रमांक कु. श्रावणी संतोष गोताड (६६.३३%), तृतीय क्रमांक कु. अर्पिता प्रदिप भालेकर (६१.३३%). तसेच कला शाखेत एकूण २३ विद्यार्थी बसले होते, त्यामधील २० विद्यार्थी पास झाले असून कला शाखेचा निकाल ही ८६.९५ टक्के लागलेला आहे.
कला शाखेतून प्रथम क्रमांक कु. समिक्षा विलास मोहिते (६२.५०%), द्वितीय क्रमांक कु.मानसी मनोहर गोताड (६० ६७%), तृतीय क्रमांक कु.सिद्धी रमेश बुरबाडकर (५८.५०%) या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. रामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शंकर साळवी, सेक्रेटरी सदानंद भिवाजी चव्हाण, सहसेक्रेटरी सुरेश साळवी, खजिनदार रमेश गंगाराम चव्हाण व सर्व संचालक, रामपूर केदारनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोज चव्हाण व सर्व पदाधिकारी, मुंबई केदारनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष पी. आर. चव्हाण व सर्व पदाधिकारी, रामपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सोसायटीचे चेअरमन जितेंद्र चव्हाण व सर्व संचालक, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी, मिलिंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मुख्याध्यापक श्री. वीरकर व शिक्षक वृंद यांच्याकडून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या सर्व शिक्षक वृंदांचेही अभिनंदन होत आहे.



