Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे-बोरज येथे इंग्रजी भाषा दिन उत्साहात साजरा

ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे-बोरज येथे इंग्रजी भाषा दिन उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड-रत्नागिरी संस्थेच्या ज्ञानदीप इंग्लिश मीडियम School (CBSE), मोरवंडे-बोरज येथे 23 एप्रिल रोजी इंग्रजी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जगप्रसिद्ध साहित्यिक William Shakespeare यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस दरवर्षी इंग्रजी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी मा. श्री. माधव पेठे यांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच William Shakespeare यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा कार्ड्स देऊन इंग्रजी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशालेमध्ये इंग्रजी विषयाशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक साधनसामग्री प्रदर्शन, भित्तीपत्रके, काव्यवाचन, भाषण स्पर्धा तसेच इंग्रजी भाषेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व, तिचा जागतिक स्तरावरील प्रभाव तसेच William Shakespeare यांच्या साहित्यिक योगदानाचा आढावा आपल्या मनोगतातून मांडला. यामध्ये अर्चित पाटील, माधव खोपडे, गौरी सावंत, मनीष आंब्रे, दृष्टी खांबे, असीम परकार, मधुरा राजमाने, सई जाधव, नभा निकम, गार्गी जाधव, शर्विल पाटील, कवीर दाभिळकर, पूर्वी चाळके, सानू सकुंडे आणि आर्वी घोसाळकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रभावी सादरीकरण केले. इंग्रजी विषयाचे प्राध्यापक श्री. विपुल देसाई यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा कशी विकसित करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. ज्ञानदीप फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजित नगरे यांनी इंग्रजी भाषेचे जागतिक महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. भरत मोरे यांनी विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचा सखोल अभ्यास करून भविष्यात जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करावी, असे आवाहन केले. संस्थेचे सरचिटणीस मा. माधव पेठे यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शौर्या पेठे, तनिषा मुनघाटे, वेदिका घोसाळकर आणि सई पाटील यांनी केले. विषय शिक्षक दत्तात्रय पाटील, मंदार भोसले, प्रवीण कांबळे, विपुल देसाई, विशाखा मोहिते, शर्वरी शिर्के, प्रेरणा वाघमारे, जयश्री शिरसाठ, शमिका धवन, कविता खेडेकर, कोमल जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सई पाटील आणि समर्थ शिरगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments