चिपळूण (प्रतिनिधी) : येथे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक फोटो गॅलरी सभागृह, वनभवन, मार्कंडी चिपळूण येथे आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये कृषी विभागाच्या विविध योजना, मोहिमा, अभियान तसेच खते व बियाणे उपलब्धता बाबत सादरीकरण वर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयातून, कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत (SMAM) दळवटणे गावचे शेतकरी रुपेश भुवड यांनी घेतलेल्या ‘मळणी आणि भात लागवड,रोटाव्हेटर यंत्राचे’ लोकार्पण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार शेखर निकम यांनी या यंत्राची चावी रुपेश भुवड यांना सुपूर्द केली आणि त्यांचे अभिनंदन केले. यामुळे शेती कामात सुलभता येणार आहे, असे मत व्यक्त केले. या बैठकी प्रसंगी चिपळूण पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जिल्हा परिषद सदस्य सौ. पूजा निकम, सौ. रावी मोरे, सौ.नेहा रहाटे, पंचायत समिती सदस्य सौ.स्नेहा साळवी, सौ उज्वला घाग व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व बैठक आ.शेखर निकम यांनी केले मार्गदर्शन
RELATED ARTICLES



