चिपळूण (प्रतिनिधी) : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ग्राहक पंधरवडा निमित्ताने जागो ग्राहक जागो अंतर्गत ग्राहकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण येथे वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांनी कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनास कोकण व महाराष्ट्रातील विविध भागातून प्रदर्शनासाठी व्यापारी, ग्राहक आले होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विजय सागर कोकण प्रांत पालक व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सौ नेहा ताई जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार सुमारे ५०० माहिती पत्रके वाटण्यात आली. तसेच ६७ ग्राहकाना संघटनेच्या संदर्भात माहिती सांगण्यात आली. कोकण प्रांत अध्यक्ष मानसिंग यादव, कोकण प्रांत सचिव चंद्रकांत मांडवकर सहसचिव विकास ढवण चिपळूण तालुका कोषाध्यक्ष सुहास चव्हाण तसेच तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल अनेक मान्यवरानी कौतुक केले
ग्राहक पंधरवडा निमित्ताने ग्राहक माहिती पत्रके वितरण
RELATED ARTICLES



