चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणची भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे. येथील शेतीचे मध्यम वेगळे आहे.अशाही परिस्थितीत प्रशांत यादव यांनी अतुलनीय धाडस दाखवत वाशिष्ठी सारखा दूध प्रकल्प उभा केला आणि यशस्वी करून दाखवला आहे. हा प्रकल्प कोकणात क्रांती घडवेल, अशा शब्दात भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी वाशिष्ठी दूध प्रकल्पाचे कौतुक केले. वाशिष्ठी प्रकल्प म्हणजे कोकणचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
युवाशक्ती जागर यात्रा आज कोकणात दाखल झाली. रायगड, खेड, गुहागरनंतर युवाशक्ती जागर यात्रा चिपळूणमध्ये दखल झाली. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आवर्जून वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी भाजप नेते वैभव खेडेकर, युवमोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या संचालिका सौ.सीमा चव्हाण, वैभव चव्हाण, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, ॲड.नयना पवार यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, जिल्हापरिषद, पंचायत समिती सदस्य व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. कृष्णराज महाडिक यांनी यावेळी वाशिष्ठी प्रकल्पाची पाहणी करून येथील व्यवस्थापणाकडून संपूर्ण माहिती घेतली. तसेच येथील उत्पादनाची देखील त्यांनी संपूर्ण माहिती घेतली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की,वाशिष्ठी प्रकल्प पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद झाला आहे. वाशिष्ठी दूध प्रकल्पाचे नाव मी ऐकून होतो, परंतु आज हा प्रकल्प पाहिल्यानंतर कोकणात असा भव्य आणि सुंदर उभा राहू शकतो आणि तो यशस्वी होऊ शकतो, हे धाडस फक्त प्रशांत यादव व त्यांचे कुटुंबीयच करू शकतात याची खात्री मला पटली आहे.
*हा प्रकल्प क्रांती घडवेल*
वाशिष्ठी प्रकल्प फक्त उद्योग, व्यावसायिक प्रकल्प नाही, तर या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात क्रांती घडेल याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. आज कोकणातील हजारो शेतकरी या प्रकल्पाला जोडले गेले आहेत. कोकणातूनच हजारो लिटर दुध या प्रकल्पात संकलन होत आहे. तब्बल ७४ उत्पादने येथे घेतली जात आहेत. ही सर्व उत्पादने अतिशय दर्जेदार असून त्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना एक उत्तम पर्यायी शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध झाला आहे. तसेच शेकडो तरुणांना येथे रोजगार उपलब्ध झाला आहे. ही एक क्रांती आहे, असेही ते म्हणाले.
*हा कोकणचा अभिमान*
पश्चिम महाराष्ट्रात असे अनेक दुग्ध प्रकल्प आहेत.मुळात पश्चिम महाराष्ट्र हा सहकारातून विकसित झालेला प्रदेश आहे.त्याठिकाणी ऊस आणि दूध अशी मूळ उत्पादने आहेत.त्यामुळे अशा संस्था त्याठिकाणी यशस्वी होतात आणि त्यातून आर्थिक उन्नत्ती देखील होत आहे.परंतु कोकणाची भौगोलिक परिस्थिती,येथील वातावरण आणि शेतीचे मध्यम फार वेगळे असताना वाशिष्ठी सारखा मोठा प्रकल्प उभारून यशस्वी करणे हे धाडस असून हा प्रकल्प म्हणजे कोकणचा अभिमान आहे.असे कृष्णराज महाडिक म्हणाले.
*मी कोकणच्या प्रेमात*
भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रथमच कोकणात आलेले कृष्णराज महाडिक म्हणाले मी प्रथम रायगडावर गेलो आणि अंगावर अक्षरशः शहारे उमटले, कोकणाचे निसर्गसौंदर्य पाहिल्यानंतर मी तर कोकणच्या प्रेमात पडलो आहे. कोकणाचा होत असलेला विकास आणि प्रगती पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र योग्य दिशेने वाटचाल करत आहे.याची खात्री होत आहे.असेही ते म्हणाले. चौकट-
त्यांचे कामाच बोलत आहे
प्रशांत यादव यांचे नाव मी ऐकत होतो. परंतु येथे आल्यानंतर येथे तरुणांचा उत्साह पहिला, भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती पहिली आणि एकूणच वातावरण पाहिल्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या कामाबद्दल बोलण्याची मला अजिबात आवश्यकता नाही, प्रशांत यादव यांचे कामच येथे बोलत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली येथे भाजपची वाटचाल अतिशय उत्तमपणे सुरू असून कोकणात प्रशांत यादव यांच्या रूपाने एक उत्तम नेतृत्व मिळाले आहे, अशा शब्दात कृष्णराज महाडिक यांनी प्रशांत यादव यांच्या कामाचे कौतुक केले.
वाशिष्ठी प्रकल्प म्हणजे कोकणचा अभिमान- कृष्णराज महाडिक* *वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट*
RELATED ARTICLES



