Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिपळूण सायकलिंग क्लबच्या उपाध्यक्ष सौ. निशा आंबेकर यांची आंतरराष्ट्रीय ॲथलेटीक्स स्पर्धेत...

चिपळूण सायकलिंग क्लबच्या उपाध्यक्ष सौ. निशा आंबेकर यांची आंतरराष्ट्रीय ॲथलेटीक्स स्पर्धेत तिहेरी सुवर्ण कामगिरी*

चिपळूण (प्रतिनिधी) : वर्ल्ड मास्टर्स स्पोर्ट्स चॅम्पियन्शिप्स २०२६ अंतर्गत श्रीराचा, थायलंड येथे दि. १७ ते २० एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित इंटरनॅशनल अॅथलेटिक्स आणि स्विमिंग स्पर्धांमध्ये चिपळूणच्या राष्ट्रीय खेळाडू सौ. निशा आंबेकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांनी खालील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून तिहेरी यश संपादन केले
थाळीफेक — सुवर्णपदक, गोळाफेक — सुवर्णपद, भालाफेक — सुवर्णपदक. अशा प्रकारे 3 सुवर्णपदकांची भरघोस कमाई करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चिपळूणचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल श्री ग्रामदैवत जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण विद्यमाने अभिनंदन! आणि श्रींचा सन्मान पूर्वक प्रसाद देतांना सौ. रमा शेट्ये, देवस्थान विश्वस्त सर्वश्री समीर शेट्ये, पंकज कोळवणकर, सुमंता शिंदे, करसल्लागार श्री. गजानन आंबेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments