चिपळूण : कोकणातील युवकांसाठी औद्योगिक क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी आता चिपळूणजवळ खेर्डी येथे उपलब्ध झाली आहे. ‘इनोव्हेटटेक इन्स्टिट्यूट’ या औद्योगिक ऑटोमेशन प्रशिक्षण केंद्रातर्फे रोबोटिक्स आणि इंडस्ट्री ४.० सारखे अत्याधुनिक कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत.
या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘९०% प्रॅक्टिकल व १०% थिअरी’ या तत्त्वावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. रिअल इंडस्ट्री प्रोजेक्ट्सवर प्रत्यक्ष काम करून विद्यार्थ्यांना जॉबसाठी तयार केले जाते. संस्थेच्या लॅबमध्ये पॅनल, सॉफ्टवेअर, आणि न्यूमॅटिक्स यावर हँड्स-ऑन ट्रेनिंग
दिले जाते.
संस्थेत १.५ महिन्यांपासून ते ६ महिन्यांपर्यंतचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. सर्व कोर्सेस ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतात. यामध्ये. मूलभूत कोर्स १.५ महिने, ऑटोमेशन फास्ट ट्रॅक कोर्स २ महिने, फुल स्टॅक ऑटोमेशन कोर्स ३ महिने, डिझाईन अँड इंजिनिअरिंग २ महिने, ऑटोमेशन मास्टर डिप्लोमा ६ महिने हे कोर्सेस शिकवले जातात.
कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी आवश्यक स्किल्स, स्वतःचे प्रोजेक्ट्सचा पोर्टफोलिओ आणि इंटरव्ह्यू देण्याचा आत्मविश्वास मिळेल. यासोबतच रिझ्युमे तयार
करणे आणि जॉबसाठी इंटरव्ह्यू गाईडन्सही दिले जाते. ‘आमचा भर फक्त प्रमाणपत्र देण्यावर नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये काम करण्यायोग्य बनवण्यावर आहे. त्यामुळे इथून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी थेट कंपनीत काम करू शकतात,’ असे संस्थेच्या संचालकांनी सांगितले.
सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून सीट्स मर्यादित आहेत. कोकणातील डिप्लोमा, इंजिनिअरिंग किंवा झालेल्या युवक-युवतींसाठी ही चांगली संधी आहे. यासंदर्भात खेर्डी ग्रामपंचायत, दुकानगाळा क्रमांक १०,११ तसेच ७४९८००४७३६/७५८८७७९५६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.



