Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedतांत्रिक कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची – मुख्य अभियंता अनिल डोये कामगार दिनी महावितरणमध्ये...

तांत्रिक कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची – मुख्य अभियंता अनिल डोये कामगार दिनी महावितरणमध्ये 32 वीज कर्मचाऱ्यांचा गौरव रत्नागिरी जिल्ह्यातील 20 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश

रत्नागिरी/सिंधुदुर्ग, दिनांक 01 मे 2026 : महावितरणच्या रत्नागिरी परिमंडल अंतर्गत महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 32 वीज कर्मचाऱ्यांना ‘उत्कृष्ठ तांत्रिक कर्मचारी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. महावितरण मध्ये तांत्रिक कर्मचा-यांची भूमिका अत्यं‍त महत्वाची आहे. त्यांच्या कौशल्य दक्षता आणि तत्परतेमुळेच वीज यंत्रणा प्रभावीपणे चालू राहते, असे गौरवोद्गार मुख्य अभियंता अनिल डोये यांनी व्यक्त केले. या कर्मचाऱ्यांची निवड ही मागील आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांनी केलेले प्रशासकीय कामकाज व ग्राहक सेवा या निकषांवर आधारित निवड समितीद्वारे करण्यात आली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 20 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 12 तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना अनिल डोये पुढे म्हणाले, कोकणासारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागामध्ये काम करताना महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. ग्राहक व महावितरण यांच्यामधील दुवा म्हणून हे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असून त्यांच्या कार्यामुळे सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचते, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, काम करताना आवश्यक त्या सुरक्षित साधनांचा वापर करणे बंधनकारक असून कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही यासाठी सतर्कता व दक्षता बाळगावी, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. त्याचबरोबर 2025-26 या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेले वीज देयक वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करत कोकण परिमंडळाने संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. या भरीव यशामागे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, जबाबदारीची जाणीव आणि ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी महत्त्वाची ठरली. या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांची दखल घेण्यासाठी लक्ष्यपूर्ती व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरित करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वांच्या कामगिरीचे कौतुक करत भविष्यातही अशीच कार्यतत्परता आणि उत्कृष्टता कायम राखण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांसाठी मराठी व हिंदी गीतांचा ‘म्युझिकल मेलोडी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अधीक्षक अभियंता सुनिलकुमार माने, सहायक महाव्यवस्थापक अजय निकम, कार्यकारी अभियंते अभिजित सिकनीस, नितीन पळसुलेदेसाई, प्रमोद बाबरेकर, हरी ताम्हणकर, वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद कानडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी व पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments