चिपळूण : नुकत्याच रत्नागिरी येथे झालेल्या उदय सामंत प्रतिष्ठान व रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजित 72 व्या राष्ट्रीय स्वास्थ्य आणि राष्ट्रीय अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा 2026 मध्ये चिपळूणचे सुपुत्र तथा डी.बी.जे. कॉलेजचे विद्यार्थी तसेच युवराज महादेव कदम यांच्या फ्लेमेबुल जिमचा व्यायाम पट्टू यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रतिष्ठेच्या वय वर्ष 20 च्या आतील महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ‘भारत उदय’ स्पर्धेत उंचीच्या तिसऱ्या गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. शरीर सौष्ठव हा त्यांचा आवडीचा आणि जिद्दीचा विषय असून, त्यासाठी ते सातत्याने मेहनत घेत आहेत. नियमित व्यायाम, शिस्तबद्ध दिनचर्या आणि योग्य आहारपद्धती यांचे काटेकोर पालन करत त्यांनी आपली शरीरयष्टी घडवली आहे. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी यापूर्वीही जिल्हा निवड चाचणीमध्ये प्रथम क्रमांक, राज्य निवड चाचणी मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. हे यश त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कु. श्लोक अनुराधा सचिन शिंदे, यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिपळूण शहर परिसरातील त्याचे नातेवाईक, हितचिंतक,मित्रपरिवार तसेच शहरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तो उज्वल यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
‘भारत उदय’ राष्ट्रीय स्पर्धेत चिपळूणचा सुपुत्र कु . श्लोक अनुराधा सचिन शिंदे प्रथम
RELATED ARTICLES



