मंडणगड (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंडणगड पोलीस स्टेशन, महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पोलीस स्थापना दिना’च्या निमित्ताने ‘पोलीस रेजिंग डे सप्ताह – 2026’ अंतर्गत महाविद्यालयात ‘शस्त्र माहिती व प्रदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडणगड पोलीस स्टेशनचे तेजस मोरे उपस्थित होते तर या कार्यक्रमास मंडणगड पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये होते. यावेळी पोलीस स्टेशनचे विनय पाटील, वैशाली चव्हाण, स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. मुकेश कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत उपप्राचार्य विष्णु जायभाये यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. तत्पूर्वी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाचे समन्वयक डॉ. भरतकुमार सोलापूरे यांनी कार्यक्रमाविषयी प्रस्तावना करुन प्रमुख पाहुण्यांची थोडक्यात ओळख करुन दिली. यावेळी पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांनी सांगितले की, ‘२ जानेवारी’ हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ‘पोलीस स्थापना दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दि. २ ते ७ जानेवारी दरम्यान ‘रेजिंग डे सप्ताहा’चे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि संरक्षणाविषयक माहिती देवून जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न असतो असे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक तेजस मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोलीस विभागाची रचना, शिस्तबध्द कार्यप्रणाली, कायद्याचे महत्व तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना, विविध गुन्हे तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो या सर्व बाबीवर माहिती देवून पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या आधुनिक विविध शस्त्र व हत्यारांची माहिती दिली. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व हत्यारांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी विचारलेल्या प्रश्नंना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. अध्यक्षिय समारोप करताना उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये म्हणाले की, पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागामार्फत समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम केले जाते. खरोखर हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून पोलीस हे समाजाच्या संरक्षणासाठी आहोरात्र काम करीत असतात. त्यांच्या या कामात आपणसुध्दा साथ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी मानले.
मुंडे महाविद्यालयात ‘पोलीस स्थापना दिना’निमित्त जनजागृती मोहिम कार्यक्रम
RELATED ARTICLES



