चिपळूण (प्रतिनिधी) : संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेज पेढांबे येथे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभ मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ.आसावरी जमदगणी, मेडिकल सर्जिकल नर्सिंग इन्चार्ज, ॲड.विजय जमदगनी, डॉ. विशाल पेटकर, बीएचएमएस मेडिकल ऑफिसर तसेच संस्थेचे संस्थापक जगदीश वाघुळदे व संस्थेच्या सेक्रेटरी सौ. हर्षा जगदीश वाघुळदे तसेच संस्थेचे प्राचार्य योगेश वळवी ॲडमिन राजीव कांबळे उपस्थित होते. या वार्षिक स्नेहसंमेलनात विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे व परंपरेचे दर्शन घडवण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. महाराष्ट्रातील पारंपारिक जाखडी नृत्य तसेच मंगळागौर या पारंपरिक नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला. यामध्ये विविध स्पर्धांमध्ये जिंकलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेजच्या शिक्षिका नयना तांबे, वृषाली जाडे, अदिती पटवर्धन, सारिका वेळेकर, वृषाली मालप, अवंतिका जंगम, मयुरी शिगवण, सोनम साळवी, धोंडीराम पेढांबकर, साक्षी जाधव आदी उपस्थित होते.
*संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेज पेढांबे येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभ उत्साहात*
RELATED ARTICLES



