Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*"प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी-एक धाव देशासाठी RUN FOR NATION" भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन*

*”प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी-एक धाव देशासाठी RUN FOR NATION” भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन*

चिपळूण (प्रतिनिधी) : मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय तसेच वसंतराव भागवत माध्यमिक व कै.सौ. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालय व सेमी इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १८ जानेवारी रोजी श्री देवी पद्मावती विद्या संकुल मार्गताम्हणे येथे सकाळी ८ वाजता चिपळूण आणि गुहागर तालुका मर्यादित भव्य अशा तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्ञानदानाचे भगीरथ प्रयत्न करणारी ‘मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी, मार्गताम्हणे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सामाजिक,राष्ट्रीय प्रवृत्ती जागृत व्हावी तसेच विद्यार्थ्यांमधून भावी आदर्श नागरिक तयार व्हावेत, शारीरिक, चारित्र्य विकास व स्वसंरक्षण यासाठी संस्कारात्मक अशा विविध उपक्रमांचे आयोजन दरवर्षी करीत असते. त्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून गेल्या १० वर्षापासून मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटी मार्फत दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन होत आले आहे. यावर्षी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धा ही वैशिष्ट्यपूर्ण असून देश समर्पित भावना व आरोग्यम् धनसंपदा’ या तत्त्वावर आधारलेली आहे. या स्पर्धेसाठी १० वर्षाखालील गटासाठी २ किलोमीटर अंतर मर्यादा असून रोख बक्षीसे अनुक्रमे रु. ३ हजार, २ हजार, १ हजार रूपये, १४ वर्षाखालील गटासाठी ५ किलोमीटर अंतर मर्यादा असून अनुक्रमे ४ हजार, ३ हजार व २ हजार रूपये, १८ वर्षाखालील गटासाठी ७ किलोमीटर अंतर मर्यादा असून ५ हजार, ३ हजार, २ हजार रूपये तसेच १८ वर्षावरील खुल्या गटासाठी अंतर मर्यादा १० किलोमीटर असून बक्षीसे अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रूपये पारितोषिके आणि सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक व प्रशस्तीपत्र, सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
गेल्या १० वर्षापासून आयोजित करण्यात येत असणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेस महाराष्ट्र राज्य अमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशनची मान्यता असून चिपळूण- गुहागर तालुक्यातील वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा या मॅरेथॉन स्पर्धेच्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. यावर्षी आयोजित केलेली ही मॅरेथॉन स्पर्धा भव्य स्वरूपाची आहे. मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी तसेच डॉ.तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ लकेश्री यांनी चिपळूण गुहागर तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, वरिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा यांना आवाहन केले आहे की दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता संपन्न होणाऱ्या भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करून या राष्ट्रीय उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुण व शारीरिक विकासास प्रोत्साहन द्यावे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी सहभाग नोंदवण्यासाठी मॅरेथॉन कमिटीचे प्रा. डॉ. नामदेव डोंगरे (९४२०९७०८२१), राकेश खांडेकर (९०४९०३८४४३) यांच्याशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments