Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*श्रीराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूणच्या अध्यक्षपदी प्रशांत देवळेकर यांची निवड*

*श्रीराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूणच्या अध्यक्षपदी प्रशांत देवळेकर यांची निवड*

चिपळूण (प्रतिनिधी) : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूणची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी सर्वानुमते या कार्यकारिणीची नियुक्ती केली. यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत देवळेकर यांची निवड करण्यात आली आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सौ. अपर्णा अशोक मेहेंदळे प्राथमिक शाळा, परांजपे मोतीवाले हायस्कूल तसेच श्री. आनंदराव पवार महाविद्यालय या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. नूतन अध्यक्ष प्रशांत देवळेकर यांनी यापूर्वी संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी पाच वर्षे यशस्वीपणे सांभाळली आहे. देवळेकर यांना सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. त्यांनी रोटरी क्लब, चिपळूणचे अध्यक्षपद तसेच रोटरी रत्नागिरी डिस्ट्रिक्टचे असिस्टंट गव्हर्नर म्हणूनही काम केले आहे. ते खो-खो खेळाचे राष्ट्रीय पंच असून रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव आहेत. तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या निवड समितीमध्येही त्यांनी काम केले आहे.
चिपळूण ॲथलेटिक्स असोसिएशन, चिपळूण क्रिकेट असोसिएशन आणि ‘आपलं चिपळूण’ या संस्थांचे ते सभासद आहेत. संस्थेच्या उपाध्यक्षपदी सौ. सई वरवाटकर, अशोक मेहेंदळे व उल्हास पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. विश्वस्त म्हणून डॉ. यतीन जाधव, वसंत उदेग व कुंदाताई खेडेकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून राजन खेडेकर, मलेश लकेश्री, सिद्धेश लाड, कुंदन खातू, सुहास चव्हाण, विनोद फणसे, विलास चिपळूणकर, शाळिग्राम विखारे आणि सौ. शिल्पा जागुष्टे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर कार्यकारिणीची घोषणा संस्थेचे माजी संचालक ॲड. भाऊ दळी यांनी केली. मावळते अध्यक्ष उदय गांधी यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. नूतन अध्यक्ष प्रशांत देवळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे समाजातील विविध मान्यवर, संस्था, सभासद व हितचिंतकांकडून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments