Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा शिक्षण संस्थाचालक संघ अध्यक्षपदी संजय शिर्के कोंढे येथील सभेत झाली निवड,...

जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघ अध्यक्षपदी संजय शिर्के कोंढे येथील सभेत झाली निवड, आ. शेखर निकम यांच्यासह अनेकांनी केले अभिनंदन

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्या अध्यक्षपदी रिंगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. कोंढे येथील रिगल सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड झाली. याबद्दल शिर्के यांचे आमदार शेखर निकम यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले. शिक्षण महर्षी अरुअप्पा जोशी, अॅड. विलास पाटणे आदींनी परिश्रम घेऊन २०१४ मध्ये संघाची स्थापना केली. हा संघ महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे यांच्याशी संलग्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांना एकाच छताखाली आणून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम संघ करीत असतो. या सभेत केंद्र व राज्य सरकारचे बदलते शैक्षणिक धोरण, संस्थांवर होणारा अन्याय, संस्थांच्या समोरील विविध प्रश्न, विद्यार्थ्यांचा घटता पट अभावी बंद होणाऱ्या शाळा, संच मान्यता निकष, शिक्षक समायोजन, वेतनेतर अनुदान शिक्षक, शिक्षकेतर संघटनांच्या मागण्यांना होणारा विलंब, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रिक्त पदे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष निवडीचा विषय आला असता संस्थापक अध्यक्ष व बार कौन्सिल रत्नागिरीचे अध्यक्ष विलास पाटणे, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षणतज्ञ सदानंद भागवत यांच्यानंतर तिसरे अध्यक्ष म्हणून शिर्के यांची निवड करण्यात आली. शिर्के हे कौशल्य विकास संस्था परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष असून त्यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट नेतृत्व’ पुरस्कार इकॉनोमिक अँड सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशन नवी दिल्ली यांनी दिला आहे. कोकणभूमी प्रतिष्ठानच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील ‘कोकण आयडॉल’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ रत्नागिरी जिल्हा यांच्या ‘मराठा भूषण’ पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. शैक्षणिक धोरणाविरोधात रस्त्यावर उतरू : संजय शिर्के जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या अडचणी, प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू. शासनाच्या नियमांमध्ये वेळोवेळी होणाऱ्या बदलांमुळे शाळा चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वेळ पडल्यास शैक्षणिक धोरणाविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करू व शैक्षणिक संस्थांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन संजय शिर्के यांनी यावेळी दिले. या सभेत कालुस्ते पंचक्रोशी ग्रामविकास मंडळाचे सदस्य सुभाष गुढेकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी रत्नागिरी जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष विलास पाटणे, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे मंगेश उर्फ बाबू तांबे, भगवान परशुराम शिक्षण मंडळाचे कृषीभूषण डॉ. तानाजी चोरगे शिक्षण संस्थेचे सचिव मिलिंद सुर्वे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे प्रशांत देवळेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments