Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*नारायण तलावाने घेतला मोकळा श्वास; नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या प्रयत्नांना यश*

*नारायण तलावाने घेतला मोकळा श्वास; नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या प्रयत्नांना यश*

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर पालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दोन दिवसांपूर्वी नारायण तलावाची पाहणी करून परिसर स्वच्छतेसह देखभालीच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तलावाच्या बाजूला वाढलेली झुडपे व जंगल साफ करणे, परिसरातील बंद पडलेले दिवे सुरू करणे, झाडांची निगा राखून नियमित पाणी देणे आदी निर्देश त्यांनी दिले होते. या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी झाल्याने नारायण तलाव परिसराने अक्षरशः मोकळा श्वास घेतला आहे.
पाहणीनंतर परिसर स्वच्छ झाला असून तलावाभोवतालचा भाग सुशोभित दिसू लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग सुरू झाली असून तलावाच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा कमी झाला आहे. नगराध्यक्ष सकपाळ यांनी पुढील कामांसाठीही आवश्यक सूचना दिल्या आहेत. शुक्रवारी दुपारी नगराध्यक्षांनी सुरू असलेल्या साफसफाई व देखभाल कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी नगरसेवक कपिल शिर्के, शिवसेना विभाग प्रमुख फैसल मेमन, आरोग्य निरीक्षक वैभव निवाते, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, बांधकाम विभागाचे अभियंते महेश डफळ व दीपक निंबाळकर, बांधकाम मिस्त्री रवी सातपुते, प्रवीण जाधव, बांधकाम लिपिक रमेश कोरवी, रोहन सकपाळ, अभियंता विभागाचे साहिल कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments