Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिपळूण कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी* *सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास*

चिपळूण कोळकेवाडीत भरदिवसा घरफोडी* *सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास*

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोळकेवाडी येथील कुंभारवाडी परिसरात एका बंद घरातून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत एकूण २ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अश्विनी एकनाथ साळवी (वय ४९, रा. कोळकेवाडी, कुंभारवाडी) यांच्या घरात ही चोरीची घटना २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १:३० ते २:३० वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी यांनी आपले सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे एका चॉकलेटी रंगाच्या पर्समध्ये ठेवून ती कपाटात ठेवली होती. अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उघडून आत प्रवेश केला आणि पर्समधील ३९ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत २,१८,९०० रुपये), २७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत ५,५०० रुपये) आणि १०,००० रुपये रोख असा एकूण २,३४,४०० रुपयांचा माल चोरून नेला. याशिवाय पर्समध्ये असलेली महत्त्वाची कागदपत्रे जसे की पॅनकार्ड, बँक ऑफ इंडियाचे पासबुक, मतदान कार्ड, आयुष्यमान कार्ड आणि आधारकार्ड देखील चोरट्याने लंपास केली आहेत. आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच अश्विनी साळवी यांनी तातडीने चिपळूण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३१ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर १७/२०२६ नुसार दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments