Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedदापोली एसटी बस चालकास मारहाण आणि धक्काबुक्की* *४ जणांविरुद्ध अदखलपत्र गुन्ह्याची नोंद*

दापोली एसटी बस चालकास मारहाण आणि धक्काबुक्की* *४ जणांविरुद्ध अदखलपत्र गुन्ह्याची नोंद*

दापोली(प्रतिनिधी) : दापोली एसटी बस घेऊन जात असताना बसमधील प्रवाशांनी किरकोळ कारणावरून बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण आणि धक्काबुक्की केल्याची घटना दापोली येथे घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात ४ संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ च्या विविध कलमान्वये अदखलपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बस चालक साई विवेक कदम (वय २७) रा. काळकाई कोंड, दापोली हे दिनांक २२ एप्रिल रोजी पहाटे बोरिवली ते दापोली ही बस क्रमांक (एमएच 49 बीई ८९४२ घेऊन येत होते. पहाटे साधारण ५ वाजण्याच्या सुमारास बस चिंचाळी फाटा येथे आली असताना राहुल ज्ञानेश्वर बिराजदार, गणेश बालाजी बिराजदार, नवाल सोमनाथ कांबळे आणि शुभम बसवराज पाटील सर्व (रा. काटगाव जिल्हा धाराशिव) या प्रवाशांनी बस मधून उतरताना किरकोळ कारणास्तव चालक कदम यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली हा वाद इतका विकोपाला गेला की चालक कदम यांना या चौघांनी हाताच्या थापटाने मारहाण केली व धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चालक कदम यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेतली व या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर चालक साई कदम यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साखरे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments