Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized“छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलताना सखोल अभ्यास हवा” – योगेश कदम यांचा इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलताना सखोल अभ्यास हवा” – योगेश कदम यांचा इशारा

खेड (प्रतिनिधी) : – महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अज्ञानातून किंवा अभ्यासाशिवाय वक्तव्य करणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. खेडमधील एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडताना, “महाराजांवर बोलताना आधी इतिहासाचा सखोल अभ्यास करा, त्यानंतरच वक्तव्य करा,” असा ठाम इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेतील योगदानाचा अभ्यास न करता कोणीही बेजबाबदार वक्तव्य करू नये. शिवरायांविषयी चुकीची अथवा दिशाभूल करणारी विधाने समाजात संभ्रम निर्माण करणारी ठरतात, असेही त्यांनी नमूद केले. सध्या महाराष्ट्र शासनात गृह राज्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले योगेश कदम हे दापोली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून विविध सामाजिक व राजकीय विषयांवर स्पष्ट भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments