Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedआडिवरे येथे महिलेवर अत्याचार करणारा नराधम शिक्षक अटकेत

आडिवरे येथे महिलेवर अत्याचार करणारा नराधम शिक्षक अटकेत

राजापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवर पाशवी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या गुन्ह्यात स्थानिक हायस्कूलमधील एका शिक्षकाचा समावेश असल्याचे समोर आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नाटे (सागरी) पोलिसांनी या नराधम शिक्षकाला शनिवारी रात्री उशिरा शोध घेऊन अटक केली आहे. शिक्षकाच्या कृत्याने आडिवरे हादरले मिळालेल्या माहितीनुसार, रामनाथ नारायण वाकडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो याच परिसरातील एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या शिक्षकानेच अशा प्रकारचे विकृत कृत्य केल्यामुळे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासली गेली आहे.

काजू बागेत पाशवी अत्याचार

पीडित महिला २० आणि २१ एप्रिल रोजी आडिवरे-रुंडे येथील एका काजूच्या बागेत कुंपणासाठी खड्डे खोदण्याचे काम करत होती. यावेळी आरोपी शिक्षक रामनाथ वाकडे याने महिलेला एकटे गाठले आणि तिच्यावर जबरदस्तीने पाशवी अत्याचार केले. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिला जमिनीवर पाडून “याबाबत कोणाला काही सांगितलेस, तर तुझे काय करीन ते बघ,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

नाटे पोलिसांची रात्रीतून कारवाई

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर नाटे (सागरी) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) प्रमोद वाघ यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनेचे गांभीर्य आणि आरोपीचे पद पाहता पोलिसांनी रात्रीतूनच शोधमोहीम राबवली. आरोपी शिक्षकाला त्याच्या परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला रितसर अटक करण्यात आली आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकानेच अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य केल्याने पालकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नाटे पोलीस करत असून, अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments