देवरूख (प्रतिनिधी) : देवरूख – रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथील एका वळणाजवळ आज रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलचा भीषण अपघात घडला असून या भीषण अपघातात हातखंबा बौध्दवाडीतील विकास काशिराम कांबळे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मेधा बोंद्रे, पो. हे. काँ. सचिन पवार, पो. काँ. नितीन बोंडवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रत्नागिरीत हलवले. व अपघताचा रितसर पंचनामा केला.
पांगरी येथे मोटारसायकलचा भीषण अपघात हातखंबा येथील तरूणाचा मृत्यू; अन्य दोघेजण गंभीर जखमी
RELATED ARTICLES



