Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized'सडक सुरक्षा-जीवन रक्षा' विषयावर डी.बी.जे. महाविद्यालयात जनजागृतीपर व्याख्यान

‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ विषयावर डी.बी.जे. महाविद्यालयात जनजागृतीपर व्याख्यान

 चिपळूण (प्रतिनिधी) : डी.बी.जे. महाविद्यालयाच्या एनसीसी व एनएसएस विभागामार्फत “सडक सुरक्षा-जीवन रक्षा” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आरटीओ अधिकारी आफरीन मुलानी व मोहसीन आवटी यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी महामार्गावर प्रवास करताना योग्य लेनचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, हेल्मेट व सीट बेल्टचा सक्तीने वापर, मद्यपान करून वाहन न चालवणे, स्टंटबाजी टाळणे, तसेच दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी न घेणे अशा महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. तसेच मालवाहू वाहनांतून अनधिकृत प्रवासी वाहतूक करू नये, शालेय विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक टाळावी, रस्त्यावरील चिन्हे ओळखावीत व ट्रॅफिक सिग्नलचे पालन करावे यावर विशेष भर देण्यात आला. “रस्ता सुरक्षा ही आपली जबाबदारी असून ती राष्ट्रहितासाठी महत्त्वाची आहे” असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाला एनसीसी विभाग प्रमुख मेजर नम्रता माने, लेफ्टनंट मधुसूदन माने, एनएसएस प्रमुख डॉ. डी. टी. कदम, कनिष्ठ महाविद्यालय एनएसएस प्रमुख अविनाश पालशेतकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. आठवले सर (उपप्राचार्य) होते, तर अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. माधव बापट सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मेजर नम्रता माने यांनी आभार प्रदर्शन केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक संस्कृती जोपासण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments