Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंजीवनी नर्सिंग कॉलेजमध्ये लॅम्प लाइटिंग व शपथविधी कार्यक्रम उत्साहात

संजीवनी नर्सिंग कॉलेजमध्ये लॅम्प लाइटिंग व शपथविधी कार्यक्रम उत्साहात

चिपळूण (वार्ताहर) : संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित संजीवनी डी.एम.एल.टी नर्सिंग कॉलेजचा वर्धापन दिन, लॅम्प लाइटिंग, शपथविधी, संजीवनी नर्सिंग कॉलेज, पेठांबे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ .शशिकांत गायकवाड, MD मेडीसीन मुंबई, Physician and critical care अपरांत हॉस्पिटल, सतीश मोरे भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष व अध्यक्ष आमदार रमेश मोरे प्रतिष्ठान, अनीत कदम, बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, डॉ. अंकुश शिंदे अपरांत हॉस्पिटल तसेच श्री. रंगाटे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री. नलावडे, प्राचार्य पॉलिटेकनिक कॉलेज, मंदार एज्युकेशन सोसायटी तसेच संस्थेचे चेअरमन जगदीश, वाघुळदे, सेक्रेटरी सौ. हर्षा वाघुळदे, अॅडमिन राजीव कांबळे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी सरस्वती व फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेसमोर ‘दीपप्तज्वलन’ केले. प्रथम वर्ष G.N.M. च्या विद्यार्थ्यांनी लॅम्प लाइटिंग व शपथविधी हा कार्यक्रम उत्तम रितीने पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी एन एम च्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले व सर्व मान्यवरांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments