Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसत्यवान रेडकर सरांचे २ व ३ मे रोजी चिपळूण व खेड मध्ये‌...

सत्यवान रेडकर सरांचे २ व ३ मे रोजी चिपळूण व खेड मध्ये‌ निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने*

चिपळूण : कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थी शासनाच्या विभागात विविध पदांवर प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी कोकणचे सुपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर, वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर, मुंबई, भारत सरकार हे पुढील वेळापत्रकाप्रमाणे खेड व चिपळूण येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार, २ मे २०२६ सकाळी ११.०० वा., डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, एल.पी.स्कूलच्या बाजूला, खेड एसटी स्टँड जवळ, ता. खेड, सायंकाळी ४.०० वा., नाभिक समाज सभागृह, खेर्डी, माळीवाडी, ता. चिपळूण तसेच रविवार ३ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० वा., ग्रामसेवक भवन, कापसाळ, ता. चिपळूण व दुपारी ३.३० वा., श्री राधाकृष्ण मंदिर, खांदाट, गवळवाडी, ता. चिपळूण.

जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. व्याख्यानासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही, फक्त वही व पेन सोबत असू द्यावे. कोणत्याही वैयक्तिक सबबी न देता कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडवण्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांसहित उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी श्री. सत्यवान यशवंत रेडकर, मो. ९९६९६५७८२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments