चिपळूण (वार्ताहर) : संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित संजीवनी डी.एम.एल.टी. नर्सिंग कॉलेज, पेढांबे येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. अविनाश चव्हाण-पाटील, मंदार एज्युकेशन सोसायटी, प्राचार्य, संस्थेचे चेअरमन जगदीश वाघुळदे, सेक्रेटरी सौ हर्षा वाघुळदे, अॅडमिन राजीव कांबळे तसेच शिक्षक वर्ग कु. नयना तांबे, कु. वृषाली जाडे, सहकारी वर्ग सौ .वृषाली मालप, कु .अवंतिका जंगम, सौ. सोनम साळी, सौ. मयुरी शिगवण, पेढांबकर काका, जाधव काकी उपस्थित होते. “उडाण क्रीडोत्सव” मध्ये जीएनएमच्या तीनही वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अंतर्गत खेळ व मैदानी खेळमध्ये कॅरम, बुद्धिबळ तसेच मैदानी खेळमध्ये कबड्डी, हॉलीबॉल, क्रिकेट, खो-खो या खेळांचा समावेश होता. क्रीडोत्सवाची सुरुवात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड सादर केली, त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी श्रीफळ फोडून व सरस्वती पूजन केले. क्रीडोत्सव ३ जानेवारी ते ०६ जानेवारी यांदरम्यान साजरा करण्यात आला. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ अविनाश चव्हाण- पाटील सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना संस्थेला व विदयार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे चेअरमन जगदीश वाघुळदे यांनी क्रीडा स्पर्धामध्ये विजयी होण्यासाठी प्रेरणा दिली. अॅडमिन श्री राजीव कांबळे सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
संजीवनी डी. एम. एल. टी. नर्सिंग कॉलेज मध्ये ‘स्पोटर्स डे’ उत्साहात
RELATED ARTICLES



