Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत आयुष्यमान आरोग्य मंदिर तळवली येथे कर्करोगाकरिता रुग्ण तपासणी

कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत आयुष्यमान आरोग्य मंदिर तळवली येथे कर्करोगाकरिता रुग्ण तपासणी

गुहागर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत गाव पातळीवर कर्करोगाकरिता रुग्ण तपासणी कार्यक्रम आयोजित केला आहे. मंगळवारी आयुष्यमान आरोग्य मंदिर तळवली येथे हे कर्करोग तपासणी शिबिर पार पडले. माझे गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर तळवली येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी यांच्या हस्ते कामथे रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.कांचन मदार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, आयुष्यमान आरोग्य मंदिर तळवलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुलकुमार कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी मुखाचा कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशय कर्करोग यांची तपासणी करून त्याबाबत उपचाराची माहिती देण्यात आली.सुमारे 142 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. असंसर्गजन्य आजारांची झपाटयाने वाढ होत असून जवळपास ६३ टक्के मृत्यु हे असंसर्गजन्य रोगामुळे होतात. त्यापैकी कर्करोगामुळे होणा-या मृत्युंचे प्रमाण ९ टक्के आहे. Globocan २०२० च्या सर्वेक्षणानुसार कर्करोगाचे १३ लक्ष २४ हजार रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विचार करिता मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा मुख कर्करोग हे तीन सर्वात जास्त आढळणारे कर्करोग आहेत. आजच्या काळातील बदलती जीवनशैली व सवयी यांमुळे कर्करोग रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. वाढत्या कर्करोगाचे प्रमाण कमी करणे व जास्तीत जास्त लोकांची तपासणी करुन त्यांना वेळीच उपचार आणि संदर्भ सेवा देण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे दि. ८ एप्रिल ते ११ मे या कालावधीत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन मार्फत जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये गाव पातळीवर कर्करोगाकरिता मोठ्या प्रमाणावर रुग्ण तपासणी प्राथमिक उपचार व संदर्भ सेवा दिली जात आहे. या वाहनामध्ये मुखाचा, स्तनाचा व गर्भाशय मुखाचा कर्करोग इत्यादींची तपासणी दंतशल्य चिकित्सक व स्त्रीरोग तज्ञ विशेषज्ञांमार्फत मोफत करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments