चिपळूण (प्रतिनिधी) –: विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०२६’ या वर्षी चिपळूण येथे संपन्न होणार आहे. भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला प्रोत्साहन देणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, कोकण विभागातील पाच पत्रकारांना यंदा सन्मानित करण्यात येणार आहे.
ही माहिती देवर्ष नारद पत्रकार सन्मान २०२६ चे संयोजक व विश्व संवाद केंद्र, मुंबईचे स्ट्रॅटेजिक हेड डॉ. निशीथ क भांडारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, या वर्षीचा मुख्य सोहळा शनिवार, २ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:३० ते ८:०० या वेळेत नवनोकण एज्युकेशन सोसायटीचे सभागृह, डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे होणार आहे.
या वर्षीचे पुरस्कार विजेते:
यंदा विविध श्रेणींमध्ये खालील पत्रकारांची निवड करण्यात आली आहे:
ज्येष्ठ पत्रकार: श्री. मेघराज जाधव (रायगड)
उल्लेखनीय कार्य (सिंधुदुर्ग): श्री. शेखर सामंत
उल्लेखनीय कार्य (चिपळूण): श्री. समीर जाधव
उल्लेखनीय कार्य (रत्नागिरी): श्री. मयुरेश पाटणकर
उल्लेखनीय कार्य (सोशल मीडिया/यूट्यूब): श्री. ऋषभ तोडणकर
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी:
या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेश जोष्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, सुप्रसिद्ध विचारवंत, संशोधक व लेखक श्री. अभिजित जोग हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. याप्रसंगी ‘जय महाराष्ट्र न्यूज चॅनल’चे संपादक श्री. प्रसाद काथे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
पत्रकारिता हा केवळ माहिती पोहोचवण्याचे साधन नसून तो राष्ट्रनिर्माणाचा एक बळकट आधारस्तंभ आहे, असा विश्व संवाद केंद्राचा विश्वास आहे. याच भावनेतून निर्भीड आणि तथ्यांवर आधारित पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना हे व्यासपीठ दरवर्षी गौरविते, असे डॉ. भांडारकर यांनी सांगितले.
या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, तसेच या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी आपले वार्ताहर व छायाचित्रकार पाठवावेत, अशी नम्र विनंती विश्व संवाद केंद्र आणि सहयोगी संस्था नवनोकण एज्युकेशन सोसायटी, चिपळूण यांच्यातर्फे करण्यात येत आहे.



