Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमृद्धी आंबेकरला चतुरंग सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार

समृद्धी आंबेकरला चतुरंग सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार

आबलोली (वार्ताहर) : गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील इ.१० वी मधील विद्यार्थिनी कु.समृध्दी सुरेश आंबेकर हिला चतुरंग प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षी निवृत्त मेजर जनरल शिशिर महाजन, राष्ट्रीय कीर्तनकार व व्याख्याते डॉ.चारुदत्त आफळे , निवड समितीचे प्रतिनिधी डॉ.मिलिंद गोखले, डॉ.प्रसाद देवधर या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत गौरव चिन्ह, गौरव प्रमाणपत्र, रोख रक्कम व पुस्तकरूपी भेटवस्तू देऊन चतुरंग प्रतिष्ठान गोडबोले सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चतुरंग प्रतिष्ठान सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार वितरण समारंभ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे नुकताच संपन्न झाला. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची समृद्धी आंबेकर हिने चतुरंग सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ.एस.एस.चव्हाण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच पत्रकार, मित्रपरिवार व सगेसोयरे आदींनी कु.समृध्दी आंबेकर व मार्गदर्शक शिक्षक तसेच आईवडील यांचे अभिनंदन केले. सदरच्या चतुरंग गोडबोले सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार वितरण समारंभासाठी चतुरंग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, पालक व व शिक्षक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments