Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेंद्रप्रमुख संघाच्या राज्य नेते पदी बाबाजी शिर्के

केंद्रप्रमुख संघाच्या राज्य नेते पदी बाबाजी शिर्के

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ महाराष्ट्र या श्रमिक संघ अधिनियम १९२६ अंतर्गत स्थापन झालेल्या नोंदणीकृत संघटनेच्या राज्य नेते पदी बाबाजी शिर्के यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक महाले यांनी ही निवड केली आहे.

बाबाजी शिर्के हे सुरुवातीला महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा दांडगा अनुभव व संघटनात्मक कार्य लक्षात घेता राज्यातील केंद्रप्रमुखांना त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याने १ जानेवारीपासून त्यांची निवड राज्य नेते पदी करण्यात आली आहे. राज्याध्यक्ष अशोक महाले यांच्यासोबत शिर्के यांनी केंद्रप्रमुखांच्या प्रश्नासाठी मंत्रालयापर्यंत लढा दिला आहे. त्यामुळे त्यांची निवड सार्थक निवड असल्याचे मत केंद्रप्रमुखांमध्ये व्यक्त होत आहे. लवकरच राज्यव्यापी बैठक आयोजित करणार असल्याचे शिर्के यांनी यावेळी सांगितले. संघटन बांधणीसाठी राज्याचा दौरा राज्याध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांसोबत करणार असल्याचे शिर्के यांनी सांगितले. बाबाजी शिर्के यांच्या निवडीचे संपूर्ण महाराष्ट्रातील केंद्रप्रमुखांमध्ये स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments