Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedखदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल विद्यालयाचे राज्यस्तरीय एलिमेंटरी...

खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल विद्यालयाचे राज्यस्तरीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट शासकीय चित्रकला स्पर्धेत यश; विद्यालयाची १०० टक्के यशाची परंपरा कायम

चिपळूण (वार्ताहर) : गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल, गोवळकोट या विद्यालयाचा नुकताच निकाल लागला. राज्य शासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत घवघवीत यश संपादन करून विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. एलिमेंटरी परीक्षेसाठी विद्यालयातील ५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १८ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, २५ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड तर ९ विद्यार्थ्यांनी ‘सी’ ग्रेड प्राप्त केला आहे. त्याचप्रमाणे इंटरमिजिएट परीक्षेसाठी १० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये ४ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेड, ४ विद्यार्थ्यांनी ‘बी’ ग्रेड आणि २ विद्यार्थ्यांनी ‘सी’ ग्रेड मिळवून विद्यालयाच्या यशाची परंपरा अधिक बळकट केली आहे. *विद्यार्थ्यांचे हे यश शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियमित सराव व पोषक शैक्षणिक वातावरणाचा परिणाम हेच यशाचे गमक आहे. या विद्यार्थ्यांना कला विषयाची आवड त्याचबरोबर कला विषयाच्या अनुषंगाने भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात होणारा फायदा या सर्व गोष्टीचा व वातावरणाचा परिणाम पाहूनच विद्यालयाचे कलाशिक्षक श्री.उदय मांडे यांनी विद्यार्थ्यांना घडविले आहे या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन डॉ.इसहाक खतीब, व्हा.चेअरमन जफर कटमाले, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब, संस्थेचे सेक्रेटरी मुजाहिद मेयर, मुख्याध्यापक इरफान शेख, कला शिक्षक उदय शंकर मांडे, माध्यमिक शिक्षक योगेश पेढांबकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करून कौतुक केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments