Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*अनमोल समाजकार्याचा अविस्मरणीय सत्कार सोहळा* *ग्रीन इंडिया इनिशिएटीव प्रा. लि. माध्यमातून ५००...

*अनमोल समाजकार्याचा अविस्मरणीय सत्कार सोहळा* *ग्रीन इंडिया इनिशिएटीव प्रा. लि. माध्यमातून ५०० हून अधिक सौरदीप बसवले* *१६ गाव मिळून रंगला कौतुक सोहळा*

चिपळूण (वार्ताहर) : ग्रीन इंडिया इनिशिएटीव प्रा. लि. या संस्थेचे संस्थापक तसेच संपूर्ण भारतभर द सोलार मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणार डॉ. सचिन धृपदा यशवंत शिगवण, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुयोग गंगावणे आणि संपूर्ण ग्रीन इंडिया इनिशिएटीव टीमचा चिपळूण तालुक्यातील पंचक्रोशीतील १६ गावांतर्फे कौतुकास्पद अविस्मरणीय सत्कार समारंभ सोहळा साकारण्यात आला. या सोहळ्याचे नियोजन आबिटगावचे आदर्श सरपंच सुहास भागडे तसेच त्यांचे सहकारी, कळंबट गावचे एक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सचिन घाणेकर त्याचबरोबर पातेपिलवली गावचे सरपंच दिनेश पुनवत यांच्या सहविचाराने करण्यात आले होते. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील २० गावे ५०० हून अधिक सौर पथदिव्यांच्या माध्यमाने उजळली आहेत. त्याचबरोबर शाळेसाठी सौर ऑफ ग्रीड प्रणाली आणि विद्यार्थ्यांना ६५० सौर पथदिवे देऊन त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच प्रगतीची दिशा दाखवली आहे. अशा अनमोल आणि महान दायित्वाबद्दल कृतज्ञता दर्शवत सर्व गावांनी मिळून डॉ. सचिन शिगवण आणि त्यांच्या संपूर्ण ग्रीन इंडिया इनिशिएटीव टीम चा कौतुकास्पद सन्मान करण्यात आला. आतापर्यंत राबवत आलेल्या सौर पथदिव्यांच्या प्रकल्पामध्ये सर्व गावांनी खूप जबाबदारीने मोलाचे सहकार्य आणि श्रमदान केले. त्यातील काही व्यक्तींनी खूपच चांगल्या पद्धतीने प्रकल्प राबविण्यासाठी नियोजनबद्ध सहकार्य केले. या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल डॉ. सचिन शिगवण आणि त्यांच्या संपूर्ण ग्रीन इंडियाच्या टीमने गावांना आदर्श गाव, आदर्श सरपंच आदर्श उपसरपंच, आदर्श ग्रामविकास अधिकारी अशा विविध वर्गामध्ये सन्मान देऊन गौरविण्यात आले. यामध्ये विशेषतः म्हणजे अबिटगावचे सरपंच सुहास भागडे यांना पंचक्रोशीतील आदर्श सरपंच म्हणून गौरविण्यात आले. त्याचबरोबर कळंबट गावचे सचिन घाणेकर यांना एक आदर्श समाजकार्यकर्ता म्हणून गौरविण्यात आले. अशा अनेक व्यक्तीमत्वांना पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ सचिन शिगवण यांनी त्यांच्या आणि ग्रीन इंडियाच्या केलेल्या समाजकार्याच्या सन्मानाबद्दल सर्व गावांचे आभार व्यक्त केले. असे विविध प्रकल्प गावामध्ये करत राहू, असे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments