चिपळूण (वार्ताहर) : चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे आदर्श विद्यामंदिर चिवेली विद्यालयात १२ जानेवारी रोजी स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी या दोन व्यक्तिमत्त्वांबद्दल आपली मनोगते व्यक्त केली. इयत्ता सहावीतील विद्यार्थिनींनी जिजाऊ वंदना गीत सादर केले. यानंतर विद्यालयातील शिक्षक रियाज अत्तार यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याविषयी आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक नितीन गुरव होते त्यांनी अध्यक्षीय भाषणातून उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक महेश चव्हाण, अक्षय साळवी तसेच शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक शैलेश आंब्रे यांनी केले.
चिवेली विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती
RELATED ARTICLES



