चिपळूण (प्रतिनिधी) : संजीवनी डी.एम.एल.टी नर्सिंग कॉलेज मध्ये “खाद्य महोत्सव” उत्साहात साजरा केला गेला. फूड फेस्टिव्हल हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय असलेला उपक्रम दरवर्षी राबवला जातो. महाविदयालयाच्या प्रांगणात सकाळ पासूनच फूड फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची स्टॉल उभारणीसाठी लगबग सुरु होती.
फेस्टिव्हलमध्ये विदयार्थी-विद्यार्थीनी एकत्र येत सुमारे विविध १०-१२ विविध पदार्थाचे स्टॉल फुड फेस्टिवल मध्ये लावले होते . यामध्ये पूरी-भाजी, चॅट भेळ, मॅन्च्युरिन, गाजरचा हलवा, मोदक तसेच कस्टर्ड मिल्क शेक या पदार्थांचा समावेश होता. यामध्ये विदयार्थ्यांनी जागेवर पदार्थ तयार करत होते. अनेक लोकप्रिय स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद उपस्थित प्राध्यापक व पाहुण्यांनी घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अविनाश चव्हाण-पाटील, प्राचार्य मंदार एज्युकेशन सोसायटी, चेअरमन श्री. जगदीश वाघुळदे , सेक्रेटरी सौ. हर्षा वाघुळदे, अॅडमिन श्री.राजीव कांबळे, शिक्षिका कु.नयना तांबे, कु. वृषाली जाडे, सौ.वृषाली मालप, कु.अवंतिका जंगम, सौ .सोनम साळवी, सौ. मयुरी शिगवण तसेच पेढांबकर, जाधव उपस्थित होते.
*संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेज मध्ये “खाद्य महोत्सव”*
RELATED ARTICLES



