Sunday, May 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी सभापती धनश्री शिंदे सावर्डे जिल्हा परिषद गटातून उभे राहणार ? कोणत्या...

माजी सभापती धनश्री शिंदे सावर्डे जिल्हा परिषद गटातून उभे राहणार ? कोणत्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणार याकडे सर्वांचे लक्ष

माजी सभापती धनश्री शिंदे सावर्डे जिल्हा परिषद गटातून उभे राहणार ? कोणत्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणार याकडे सर्वांचे लक्ष

चिपळूण : पंचायत समितीच्या माजी सभापती सौ धनश्री रवींद्र शिंदे या सावर्डे जिल्हा परिषद गटातून उभे राहणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. धनश्री शिंदे या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी असून त्या शिवसेना शिंदे गटातर्फे ही निवडणूक लढवणार असल्याचे समजते. धनश्री शिंदे या मागील निवडणुकीमध्ये आलोरे जिल्हा परिषद गट अंतर्गत येणाऱ्या पिंपळी पंचायत समिती गणातून विजयी झाल्या होत्या.चिपळूण पंचायत समितीच्या सभापती म्हणून देखील त्यांनी कामगिरी केली होती. यावेळी अलोरे जिल्हा परिषद गट पुरुष आरक्षित पडल्याने त्यांनी सावर्डे या महिला आरक्षण असलेला जिल्हा परिषद गट निवडणुकीसाठी निवडला असल्याचे खात्रीलाय वृत्त समजते.यामुळे सावर्डे जिल्हा परिषद गटातून धनश्री शिंदे कशाप्रकारे व्युहरचना करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments