Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*पंचायत समिती कापसाळ गण मतदार संघातून विनोद हिरे यांनी भरला उमेदवारी अर्ज*

*पंचायत समिती कापसाळ गण मतदार संघातून विनोद हिरे यांनी भरला उमेदवारी अर्ज*

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण तालुक्यातील कापसाळ गणातून शिंदे शिवसेना माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते प्रशांत यादव व भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या सूचनेने इच्छुक उमेदवार विनोद हिरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कापसाळ गणात मिरजोळी, कामथे, कापसाळ व धामणवणे ही चार गावे आहेत. कापसाळ गणाचे आरक्षण अनुसूचित जाती पुरुष असल्याने या गणात चुरशीची लढत होणार आहे. विनोद हिरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, २०२२ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपला. मात्र निवडणुक तीन वर्ष उशिरा २०२६ मध्ये निवडणूक जाहीर करण्यात आल्या. ३ वर्षाच्या काळात प्रामाणिकपणे विकासाचे काम केले. कोरोना काळात देखील आपलं योगदान होते. २०१८ साली मिरजोळी ग्रामपंचायत सदस्य होतो, त्याचा अनुभव माझ्याकडे आहे. आता पंचायत समिती कापसाळ गणातून संधी मिळाली असून माझ्याबरोबर जिल्हा परिषद गटातून भाजप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शिंदे शिवसेना पक्षाकडून रावी सतीश मोरे तर खेर्डी गणातून विनोद भुरण यांना उमेदवारी दिली आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव व जिल्हाध्यक्ष सतीश मोरे तसेच आरपीआय तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, सचिव उमेश सकपाळ व शहराध्यक्ष मंगेश जाधव यांनी दाखवलेला विश्वास व त्यांची साथ असल्याने आम्ही बाजी मारणार, असा विश्वास श्री.हिरे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments