चिपळूण (वार्ताहर) : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ ची जोरदार धामधूम सुरू आहे. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी गर्दी होत आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवत आहेत. यामध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपा पक्षाच्या मार्फत नवीन चेहऱ्यांना संधी मिळत असून पंचायत समितीच्या कुटरे गणामध्ये उच्चशिक्षित अशा अक्षता राजाराम होवले हिला उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे नवीन चेहरे भाजप पक्षामुळे राजकारणामध्ये उदयास येत आहेत. कुटरे पंचायत समिती गणातून अक्षता होवले हिने उमेदवारी अर्ज दाखल केला. कोकरे जिल्हा परिषद गटातील दोन पंचायत समिती गण एक कोकरे गण आणि दुसरा कुटरे गण आहे. गणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिंदे शिवसेना, उबाठा आणि भाजपा या पक्षाच्या मार्फत उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. यातच भाजपच्या वतीने कुटरे गणामध्ये नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आलेली आहे . या कुटरे गणात भाजपा पक्षाच्या वतीने अक्षता राजाराम होवले हिला उमेदवारी देण्यात आली आहे. सदरची उमेदवार ही जरी नवखी असली तरी सुद्धा उच्चशिक्षित आहे. भाजपाने सक्षम उमेदवार देण्याचे धोरण अवलंबले आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय ज्ञान आणि लोकसंपर्क असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी देत एक प्रकारे नवीन जागृती निर्माण केली आहे. अक्षता होवले यांनी बोलताना सांगितले की, निश्चितच मला मिळालेल्या संधीचे मी सोनं करेन. गणातील लोकांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी निश्चित पक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहीन. आजपर्यंत बऱ्याच समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या नवनवीन योजना आहेत. त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेन. लोकोपयोगी या सर्व योजना असून त्यातूनच लोकांचा विकास होत आहे. त्याचबरोबर लोकांच्या विकास कामांकडे सुद्धा पक्षाच्या माध्यमातून लक्ष दिले जाईल. सर्वांगीण विकास कसा होईल याकडे निश्चितच लक्ष देऊ असे त्यांनी सांगितले. अर्ज दाखल करतेवेळी भाजपा नेते प्रशांत यादव, सपना यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश कानसे, जगदीश गोरीवले आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
*मला मिळालेल्या संधीचे सोन करेन- अक्षता होवले* *कुटरे गणात भाजपकडून नवीन चेहऱ्याला संधी*
RELATED ARTICLES



