Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा-३ स्पर्धेत डॉ. आंबेडकर हायस्कूल तालुक्यात प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा-३ स्पर्धेत डॉ. आंबेडकर हायस्कूल तालुक्यात प्रथम

मंडणगड (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड या प्रशालेचे मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना” टप्पा तीन स्पर्धेत तालुक्यात प्रथम मिळवीला आहे. सरकारी शाळांचे आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक- पालक- विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा तीन हे अभियान राबवण्यात आले या अभियानात मंडणगड तालुक्यातील २३ माध्यमिक शाळांनी भाग घेतला होता. या अभियानांतर्गत पायाभूत सुविधा, शासन ध्येयधोरण अंमलबजावणी, शैक्षणिक संपादनूक या मुद्द्यांच्या आधारे मंडणगड तालुक्यात दि. ५ जानेवारी रोजी केंद्रस्तरीय कमिटीने व १६ जानेवारी रोजी तालुका स्तरीय कमिटीने विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन विविध मुद्द्यांच्या आधारे परीक्षण केले. अभियानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड या विद्यालयाने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विविध संदेश वहनाच्या माध्यमातून तसेच विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन जनसमुदायाने अभिनंदनचा वर्षाव केला व करत आहेत. या यशामागे संस्थेचे अध्यक्ष, आमदार अशोक जगताप व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. संस्था व शालेय पदाधिकारी, स्थानिक प्रशासन, शालेय प्रति दानशूर व्यक्ती, शिक्षक, पालक या सर्वांचे सहकार्य लाभले. व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments