Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedअसगोली गटात होणार चुरशीची लढत *विक्रांत जाधवांना टक्कर देण्यासाठी संतोष जैतापकर रिंगणात*...

असगोली गटात होणार चुरशीची लढत *विक्रांत जाधवांना टक्कर देण्यासाठी संतोष जैतापकर रिंगणात* *भाजपातून शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज केला दाखल*

गुहागर गुहागर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता खरा रंग येणार आहे. नव्याने झालेल्या असगोली गटात काटे की टक्कर पहावयास मिळणार असून आम. भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांना टक्कर देण्यासाठी युतीकडून भाजपमधून सेनेत प्रवेश केलेले संतोष जैतापकर यांना थेट रिंगणात उतरवले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे अर्ज भरणे सुरू असतानाच अचानकपणे गुहागर मध्ये राजकीय उलथापालक पाहावयास मिळाली. भाजपचे ओबीसी जिल्हा सेलचे अध्यक्ष संतोष जैतापकर यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेश पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच जैतापकर यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता विक्रांत जाधव यांच्यासाठी तगडा प्रतिपर्धी युतीकडून देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. जैतापकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर पक्ष स्तरावर सगळी चर्चा करूनच आपण शिवसेनेत प्रवेश केला असून विधासभेवेळी आपल्याला दिलेला शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री उदय सामंत यांनी पाळला असल्याचे सांगितले. तसेच गुहागर आपले होम पीच असून युतीकडून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.यामुळे असगोली गटात महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या जिल्हा परिषद गटाकडे लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments