गुहागर (प्रतिनिधी) : गुहागर पंचायत समिती निवडणूकिसाठी तळवली पंचायत समिती गणातून युतीच्या माध्यमातून भाजपकडून मंगेश जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तळवली पंचायत समिती गणातुन एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे या ठिकाणी अतिशय रंगतदार लढत होणार आहे. याठिकाणी युतीकडून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी आम. डॉ. विनय नातू यांचे खंदे समर्थक व सहकारी मंगेश जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंगेश जोशी यांच्यासमोर उबाठाचे आम. भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक संदीप धनावडे यांचे मुख्य आव्हान असणार आहे.या गणातून राष्ट्रवादीकडून संतोष जोशी, बसपाकडून सखाराम पवार, अपक्ष म्हणून महेश शिगवण, काँग्रेसकडून रियाज ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंगेश जोशी यांना प्रशासन तसेच राजकीय चांगलाच अनुभव असल्याने या पंचायत समिती गणातून त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तळवली पं. स. गणातून भाजपकडून मंगेश जोशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल युती विरुद्ध महाविकास आघाडीत लढत
RELATED ARTICLES



