Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedछाननीत तालुक्यातील ३२ पैकी ३१ उमेदवारी अर्ज वैध

छाननीत तालुक्यातील ३२ पैकी ३१ उमेदवारी अर्ज वैध

 मंडणगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक नामनिर्देशन पत्रांची छाननी २२ जानेवारी रोजी निवडणुक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अक्षय ढाकणे यांच्या उपस्थितीत तहसिल कार्यालय भिंगळोली येथे करण्यात आली. तालुक्यात २ जिल्हा परिषद गट व ४ पंचायत समिती गणाकरिता ३२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, यातील केवळ १ नामनिर्देशन पत्र तांत्रीक कारणामुळे अवैध ठरले. दि. २१ जानेवारी रोजी सादर करण्यात आलेल्या ३२ अर्जापैकी ३२ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी निवडणुक रिंगणात कोण राहणार व कोण बाहेर पडणार याबद्दली स्पष्टता येणार आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय यादी खालीलप्रमाणे जिल्हा परिषद गट बाणकोट वैध अर्ज सहा प्रताप घोसाळकर (शिवसेना) प्रकाश शिगवण (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) प्रमिला शिगवण (अपक्ष) संतोष घोसाळकर(अपक्ष) सम्यक जाधव (बसपा) संजय शेडगे (अपक्ष) जिल्हा परिषद गट भिंगळोली वैध अर्ज सहा अस्मिता केंद्रे(शिवसेना) संतोष गोवळे(शिवसेना उ.बा.ठा) अमिता शिंदे (अपक्ष) जमीर माखजणकर(कॉंग्रेस आय) सचिन थोरे (अपक्ष) संतोष घोसाळकर (अपक्ष) पंचायत समिती गण बाणकोट वैध अर्ज तीन मुस्ताक मिरकर(राष्ट्रवादी कॉंग्रेस) अनिल राटाटे (शिवसेना) हरिश्चंद्र कोदरे (अपक्ष) पंचायत समिती गण तुळशी वैध अर्ज सहा दीप्ती घडशी (शिवसेना) रत्ना मोहिते (भा.ज.पा.) रेखा भागडे (अपक्ष) रेश्मा जाधव (वंचीत बहुजन आघाडी) मीरा कदम (शिवसेना उ.बा.ठा) प्राची पवार (अपक्ष) पंचायत समिती गण भिंगळोली वैध अर्ज सहा दीपक मालुसरे (शिवसेना) प्रवीण कदम (ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) वामन जाधव (शिवसेना उ.बा.ठा.) अनंत शिंदे (अपक्ष) अब्दुलकादिर बुरोंडकर (काँग्रेस आय) वसंत सुतार (अपक्ष) पंचायत समिती गण इस्लामपूर वैध अर्ज चार रोशनी दिवेकर (अपक्ष) वैष्णवी टक्के(शिवसेना उ.बा.ठा.) स्मिता थोरे (भाजपा) प्रणाली चिले (शिवसेना) या गणातून अपक्ष उमेदवार रोशनी दिवेकर यांनी सादर केलेल्या दोन अर्जापैकी एक अजून तांत्रीक कारणाने अवैध ठरविण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments