Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुंडे महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्साहात

मुंडे महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन उत्साहात

मंडणगड (प्रतिनिधी) : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ दिनानिमित्त ग्रंथालय विभाग व मराठी भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. संजयकुमार इंगोले, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. संगीत घाडगे, डॉ. सूरज बुलाखे, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, प्रा. महादेव वाघ, प्रा. सलील मिशाळे, प्रा. रिदा चिमावकर, प्रा. प्राची कदम आदी मान्यवर उपस्थित होते. संजयकुमार इंगोले यांनी आपल्या प्रास्ताविकात ग्रंथप्रदर्शन व मराठी भाषा संवर्धन बाबतचा उद्देश स्पष्ट करुन विद्यार्थ्यानी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घटान करताना डॉ. वाल्मीक परहर यांनी सांगितले की, मानवी जीवनात पुस्तकांचे महत्व अनन्य साधारण असल्याने विद्यार्थ्यानी व्यक्तिमत्त्व विकासासाठी ग्रंथालयचा वापर करावा, कारण अवांतर वाचनाने आपल्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास होतो. तसेच आपल्याला वेळेचा सदुपयोग करता येतो. चांगले काय वाईट काय हे समजते. त्याकरिता आपण सर्वांनी ग्रंथालयातील वाचन साहित्याचा वापर करून जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करायला शिकले पाहिजे. ग्रंथ प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या महाराष्ट्र शासनाच्या संस्थामार्फत प्रकाशित केलेले कोश, विविध खाजगी प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केलेले साहित्य, चरित्र ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, कोश वाड्.मय, शब्दकोश, इतिहास, चरित्रग्रंथ, मराठी ललित साहित्य, स्पर्धा परीक्षा यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ वरिष्ठ व करिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यानी घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments