Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedखरवते भाग शाळेत मियावाकी पद्धतीने देशी वृक्षसंवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन

खरवते भाग शाळेत मियावाकी पद्धतीने देशी वृक्षसंवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन

 चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे अंतर्गत भागशाळा खरवते येथे बुधवार दि. २१ जानेवारी रोजी ‘सृष्टीज्ञान संस्था’ व सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमानाने मियावाकी पद्धतीने देशी वृक्षसंवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. आमदार शेखर निकम यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांच्या हस्ते सह्याद्रि शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक मारुती घाग, संस्थेचे सचिव महेश महाडिक, कृषी कॉलेजचे प्राचार्य सुनितकुमार पाटील, शालेय समितीचे चेअरमन अनंत घाग, खरवते गावच्या उपसरपंच सौ. संजीवनी घाग, सृष्टीज्ञान संस्थेचे प्रमुख प्रशांतजी शिंदे, प्रकल्प अधिकारी कुणाल अणेराव, स्कूल कमिटी सदस्य संदेश सावंत, सुहास महाडिक, शिवाजीराव घाग यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मनोगतात मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी वृक्षसंवर्धन व वनसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून स्थानिक, देशी वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. वृक्षांशिवाय ऑक्सिजन मिळणार नाही आणि ऑक्सिजनशिवाय मानवी जीवन अशक्य आहे, त्यामुळे हा प्रकल्प समाजासाठी व भावी पिढीसाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचा संदेश त्यांनी दिला. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक मारुती घाग यांच्या हस्ते प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मियावाकी पद्धतीने विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता विद्यालयाचे प्रमुख चंद्रकांत निंबाळकर यांनी आभार प्रदर्शनाने केली. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारा असून भविष्यात शाळा परिसरात दाट, नैसर्गिक जंगलनिर्मितीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments