मंडणगड (प्रतिनिधी) : माघी गणेश जन्मोत्सव निमीत्ताने नवयुवक तरुण मंडळ मंडणगड यांच्यावतीने २२ जानेवारी रोजी किल्ले मंडणगड येथे उत्सवाचे ४२ व्या वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे. यानिमीत्ताने अभिषेक, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद आदी कार्यक्रमांसह केळवत येथील भैरी प्रासादीक भजन मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रमही व क्रीकेट स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. तालुकावासीयांचे आकर्षणाचे विषय असलेल्या किल्ले मंडणगड येथील या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थितीत भक्तगणासांठी माजी सरपंच कै. राम कोकाटे यांचे स्मरणार्थ श्रीमती रोहिणी कोकाटे यांच्या वतीने प्रसाद व महाप्रसाद देण्यात आला. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष समिर लेंढे, राहुल कोकाटे, श्रीकांत लेंडे, सौरभ लेंढे, विजय लेंढे, काशिनाथ बैकर यांच्यासह मंडळाच्या सर्व सभासदांनी मेहनत घेतली. दरम्यान, माजी गणेश जन्मोत्सवाचे निमीत्ताने तालुक्यातील धुत्रोली, शेनाळे, आसावले, वेळास, तुळशी या गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
किल्ले मंडणगड येथे माघी गणेश जन्मोत्सवाचे निमीत्ताने विविध कार्यक्रम
RELATED ARTICLES



