चिपळूण (वार्ताहर) : खेड तालुक्यातील शिव येथे लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी यांचा गेट-टुगेदर डॉ.शमिना परकार फातिमा हाऊस येथे शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी सकाळी १० ते ४ दरम्यान मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. या गेट-टुगेदर कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी याने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात सकाळी १० ते १२ वाजता कुलकर्णी नेत्रा रुग्णालय व डॉ. दाभाडे यांचा ॐकार दाताचा दवाखाना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५ ते ३० ग्रामस्थांनी लाभ घेतला. यानंतर शिबिरात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वीरेंद्र चिखले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, खेड तालुक्यातील ‘शिव’ हे निसर्गरम्य गाव असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेला गाव आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना नेत्र व दातांचे महत्त्व कळावे याबाबत मोफत तपासणी शिबिर श्रीमती.परकार यांनी आयोजन केले. माजी अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीच्या डॉ.शमिना परकार यांचे काम वाखाणण्याजोग आहे. त्यांनी अनेक मिशन सक्सेसफुल केले असून परोपकारी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक सेवेचा वसा चालवणारी, दातृत्व हा गुण असणारी कर्तबगार, कर्तव्यदक्ष असे शब्दसुमनात श्रीमती. परकार यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच दोन गरजू निराधार मुलींना शाळा उपयोगी सर्व वस्तू डॉ.शामिना परकार यांनी दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. शमीना परकार यांनी मानले.
*शिव येथे लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीचा गेट टुगेदर उत्साहात*
RELATED ARTICLES



