Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*इंटक विद्युत कामगार पतसंस्थेच्या संचालकपदी जितेंद्र जावकर बिनविरोध*

*इंटक विद्युत कामगार पतसंस्थेच्या संचालकपदी जितेंद्र जावकर बिनविरोध*

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र राज्य इंटक विद्युत कनिष्ठ कामगार सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी जितेंद्र जावकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. श्री. जावकर यांना महावितरणमध्ये काम करत असताना विजाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महावितरणच्या गणेशोत्सव मडळमध्ये गेली नऊ वर्ष ते संक्रेटरी पदावर काम करीत आहेत तसेच त्यांनी महावितरणच्या नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सगीत दिग्दर्शक म्हणून प्रथम क्रमांकची पारिताषिके पटकावली आहेत. महावितरणच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिल आहे. दरम्यान, या निवडीबद्दल श्री. जावकर यांचे पतसंस्थेचे अध्यक्ष राकेश रेडीज, उपाध्यक्ष विद्यासागर महाडिक, सचिव माणिक पाटील, व्यवस्थापक प्रदीप भोसले, संचालक मुस्तफा तडवी, समीर धाडवे, दीपक कदम, दिलखुश मोरे, गौरव गुरव, अब्दुल्ला सय्यद, प्रफुल्ल मोरे, धनाजी पवार, संचालिका श्रीमती मंगल माने, लिपिक प्रमोद बुरटे यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments