Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedउमरोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार सुरू  मतदारांचा उत्तम प्रतिसाद

उमरोली जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार सुरू  मतदारांचा उत्तम प्रतिसाद

चिपळूण (वार्ताहर) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. उमरोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार निलेश चव्हाण आणि गुढे गणातून सायली संतोष बंगाल यांनी ही प्रचाराला जोर सुरुवात केली आहे. त्यांना मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात जिल्हा परिषद उमरोली आणि पंचायत समिती गुढे व उमरोली गण असे तीनही उमेदवार उभे आहेत. जिल्हा परिषद उमरोली गटाचे उमेदवार मार्गताम्हाणे गावचे सुपुत्र नीलेश चव्हाण यांना उमेदवारी मिळाली असल्याने आता या गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे. गुढे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण असल्याने राष्ट्रवादी पक्षाकडून चिवेली शिबेवाडी येथील सौ सायली संतोष बंगाल या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. उमरोली गटात या दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेत असून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सायली बंगाल कुणबी समाजाच्या असल्याने समाजातील मते त्यांना विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. याचा फायदा हा जिल्हा परिषद उमेदवार निलेश चव्हाण यांनाही होणार आहे. राष्ट्रवादी पक्षाला या गटात आपले वर्चस्व निर्माण करण्याची ही नामी संधी असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments