Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूण नगर परिषदेत ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात* *शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात नगराध्यक्ष उमेशदादा...

*चिपळूण नगर परिषदेत ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात* *शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण*

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेत आज सकाळी नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ऐतिहासिक सन्मान:
चिपळूण नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष म्हणून उमेशदादा सकपाळ यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला, ही बाब यावेळी विशेष ठरली.

*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन*
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता बहादुरशेख नाका येथील भारताचे संविधानकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी अभिवादन करून केली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना:
यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. येथेही फटाक्यांच्या आतषबाजीत वातावरण देशभक्तीमय झाले.
ध्वजारोहण व जल्लोष
नगर परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर जिलेबी वाटप करून प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाला उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती निहार कोवळे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, आरोग्य सभापती शुभम पिसे, शिक्षण सभापती हर्षाली पवार, सौ. आरती सकपाळ व सकपाळ कुटुंबीय, सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू साडविलकर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments