चिपळूण (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सोमवारी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, खेडचे माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची योगिता डेंटल कॉलेज येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान रामदास कदम यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा सत्कार केला. तर नगराध्यक्ष सकपाळ यांनी रामदासकदम यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी रामदास कदम म्हणाले की, चिपळूण शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देताना आपण कधीही कमी पडणार नाही. “मी स्वतः आहे, माझा एक मुलगा राज्यमंत्री आहे, तर दुसरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे चिपळूणच्या विकासाबाबत कोणतीही चिंता करू नका,” असे आश्वासन त्यांनी दिले. या भेटीप्रसंगी बांधकाम सभापती कपिल शिर्के, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, सचिन पेंढारी, निशांत जंगम यांच्यासह श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ, ओझरवाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
*नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी घेतली रामदास कदम यांची भेट*
RELATED ARTICLES



