Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*चिपळूणमध्ये प्रजासत्ताक दिनी शिवसेनेकडून ध्वजारोहण*

*चिपळूणमध्ये प्रजासत्ताक दिनी शिवसेनेकडून ध्वजारोहण*

चिपळूण (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनानिमित्त माऊली संपर्क कार्यालयासमोर शहर शिवसेना व स्वामी समर्थ मित्र मंडळ यांच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आले. नगराध्यक्ष, शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला बांधकाम सभापती कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, शिक्षण व क्रीडा समिती सभापती हर्षाली पवार, महिला बालकल्याण समिती उपसभापती राणी महाडिक, शिवसेनेचे नगर पालिकेतील गटनेते अंकुश आवले, नगरसेवक गणेश आग्रे, नगरसेविका नीलम जाधव, नगरसेवक प्रमोद बुरटे, सौ. आरती सकपाळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नागरिकांना देशभक्तीची भावना जपण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम नगरातील पारंपरिक ध्वजारोहणांपैकी एक मानला जातो, ज्यामुळे शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments